Saturday, 17 January 2015

नव्या आयुष्यासवे नवे स्वप्न ते बघती...!!!


वादळाच्या वाय्रासवे झाडाची पालवी विखुरती
मनातील आसवासवे भावना मनी जडती

वाय्राच्या भितीसवे पक्षी बिलगून बैसती
ओठ शांत तरी शब्द मना द्वंद्व करती

झाडाच्या पालवासवे घरटे खाली पडती
डोळ्यातील पाण्यासवे पिल्ले घरटे बघती

वाय्राच्या स्पर्शासवे पिल्ले थरथर कापती
मायेच्या आशासवे प्रेमाचा गोडवा शोधती

पावसाच्या थेंबासवे पिल्ले चिंब भिजती
पावसाच्या थांबण्यासवे पिल्ले किलबिल करती

तुटलेल्या घरट्यासवे स्वप्ने तुटलेली दिसती
राहिलेल्या स्वप्नासवे नवा आसरा शोधती

तुटलेल्या स्वप्नांसवे ते आठवणींना सोडती
इंद्रधनुष्याच्या रंगासवे नव्या दिशा ते शोधती

नव्या आसवासवे ते नव्या वाटा शोधती
नव्या भरारीसवे ते नवे क्षितिजे गाठती

नव्या आयुष्यासवे नवे स्वप्न ते बघती...


© ओंकार शिंदे
१७ जानेवारी २०१४

No comments:

Post a Comment