हसून हसून डोळे भरले..
कळलेच नाही अश्रु सरले...
हळूच एक थेंब टिपताना,
कळले ते प्रेम जे फक्त शब्दात उरले...
शब्द कधी अपुरे पडले...
स्वप्न होते नकळत तुटले...
स्वप्न जुळवताना कळले,
माझे ते प्रेम जे फक्त आठवणींत उरले...
पावसाचे थेंब आेघळताना दिसले...
जसे माझे हात तुझ्या केसांमधून फिरले...
त्या थेंबास स्पर्श करता...
जाणवले ते अश्रु जे तू थेंबासारखे पुसले...
का तु माझे स्वप्न मोडले...
आता फक्त भास उरले...
तुझा विचार करता
हसणारे मन कायमचे रुसले...
प्रेम म्हणजे काय ते कळले...
आठवणींच्या जागी किस्से उरले...
तुझ्या प्रेमासाठी झुरताना...
कळले ते प्रेम जे शब्दात उरले...
© ओंकार शिंदे
२१ ऑगस्ट २०१४
