मला प्रेम महत्वाच आहे.
तिला तीचं Aim महत्वाच आहे.
स्वप्नातला रस्ता तिचा आहे,
पायवाटवर मी एकटाच आहे
प्रेम आणि Aim यात काय महत्वाच आहे ?
यात थोडं Confusion आहे.
तरी तिच्यासाठी ओढ आहे ,
तिच्या येण्याची आस आहे.
तिचे माझ्यावर प्रेम आहे ,
तरी इतरांसाठी तिचा त्याग आहे.
नक्की ओढ आहे का प्रेम आहे ?
यात थोडं Confusion आहे.
तिच्या स्वप्नात मीच आहे,
तरी अस्तित्वातला मी नको आहे.
आयुष्य माझ्याबरोबर जगायचय,
तरी स्वप्नातच तिला राहायचं आहे.
नक्की आयुष्य कि स्वप्न जगायचय ?
यात थोडं Confusion आहे.
तिचं माझ्यावर प्रेम आहे.
पण मनातच फ़क्त हो आहे.
ओठांवर सांगता येत नाही,
पण डोळ्यातून कळतं कि मी तिचा आहे
मला मनात का ओठी आणायच ?
यात थोडं Confusion आहे.
मला आयुष्य जगायचं आहे
तिला स्वप्नातच रहायचं आहे .
स्वप्नी राहून सुद्धा ,
प्रेम माझ्यावरच करायच आहे.
स्वप्नी जगण्यापेक्षा आयुष्य का नाही जगावं ?
यात थोडं Confusion आहे.
© ओंकार शिंदे
३ जानेवारी २०१५

No comments:
Post a Comment