Thursday, 1 February 2018

अन्विता कधी वाटतं....!!




अन्विता कधी वाटतं
तुझ्यासारखं जगावं
मनसोक्त हसावं
कधीतरी रडावं

अन्विता कधी वाटतं
वाटेल तेव्हा चालावं
पाय दमल्या दमल्या
कोणी कडेवर तरी घ्यावं

अन्विता कधी वाटतं
उशिरा उठावं
हव तेव्हा झोपावं
हवं तेव्हा उठावं

अन्विता कधी वाटतं
मनापासून रडावं
जवळ घेऊन
पापे घेणारं कोणी असावं

अन्विता कधी वाटतं
हवं तेवढं चुकावं
चुकांकडे लक्ष न देता
कोणीतरी शिकवावं

अन्विता कधी वाटतं
निरागस असावं
आयुष्याचं गूढ
एका हसण्यात दिसावं

अन्विता कधी वाटतं
तूझ्यासारखं लहानच असावं
तुलाच बघताना
आम्ही लहानपण जगावं

© ओंकार शिंदे
१ फेब्रुवारी २०१८

Friday, 15 May 2015

माझ्या मना वाटू लागले काही....!




नवे नाते… नवी सुरवात 
नव्या दुनियेचा नवा प्रवास 
न्यात नाही पुढे होणारे काही 
माझ्या मना वाटू लागले काही     
माझ्या मना वाटू लागले काही     

मना वाटे शब्द बोलू काही 
संवाद होते पण शब्द नाही 
तुला बघता क्षणी 
शब्द माझे मनीच राही 

परत वाटते मना बोलू काही
मनातले शब्द ओठांवरी येई 
तुला हसताना ऐकता 
शब्द माझ्या ओठांवरीच राही 

मना वाटे तु भेटण्यास येई  
हळूच नकळत नजरेतून संवाद होई 
तुझ्या त्या नजरेत बघताना 
माझे मन तुझ्या नजरेत धुंद होई  

मना वाटे तुझा भास काही 
तू समोर नसताना तुझा ध्यास राही 
त्या भासातून हुलकावणी देताना 
वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्शून जाई 

मना वाटे मनं जुळतील का ही ?
शब्दांशिवाय संवाद होतील काही 
प्रत्येक संवाद होताना जणू 
नजरेत प्रेम असेल काही… 

माझ्या मना वाटू लागले काही…. 
माझ्या मना वाटू लागले काही…. 

© ओंकार शिंदे 
१५ मे २०१५

Thursday, 9 April 2015

कभी लगता है...!!!



कभी लगता है
कर पाता तेरे दिलसे बात तो शिकायत ना करनी पडती
आज अकेला जी रहा हूँ तुम्हारी याद मै
तेरी यादोमे जिंदगी बितानी नही पडती

कभी लगता है
दिल की बात ओठोंपे आ जाती तो अच्छा होता
आज वो दिल कह रहा है; कह देता पहले
तो एक प्यार का नया अपसाना होता

कभी लगता है
घडी का काटा मै जब चाहे रोक सकता
तेरा हात पकडकर तेरी आखोंमे देखकर
हर एक लमहा मै अपनी तरहसे जी सकता

कभी लगता है
तू साथ होती तो जिनेका क्या मजा होता
तेरे ओठोंपर मेरे ओठोंका नाम होता
और साथ बिताया हुँवा हर एक पल; यादगार लमहा होता

कभी लगता है
आपके इन ओठोंकी मुस्कुराहटमे हम हकदार होते
कब आखें बंद हो जाए पता नही चलता
काश हम जिंदगीभर आपके साथ होते



© ओंकार शिंदे
१० एप्रिल २०१५

Tuesday, 17 March 2015

खरचं वाटतं कोणी तरी असावं...!!



खरचं वाटतं कोणी तरी असावं… 
बरच काही सांगायचं आहे पण,
ऎकणार कोणीतरी असावं....
माझ्या प्रेमाला ओळखुन,
जीव लावणार कोणीतरी असावं...
मैत्रिच्या नात्याला जोड,
म्हणुन प्रेमाचं नात असावं...

खरचं वाटतं कोणी तरी असावं...
दु:खाना घालवण्यासाठी,
हसणारं कोणीतरी असावं...
आयुष्य जगण्यासाठी,
सोबती कोणीतरी असावं...
देण्यासारखं खुप आहे पण,
घेणार कोणीतरी असावं...

खरचं वाटतं कोणी तरी असावं...
हसण्यासारखं खुप आहे पण,
हसायला कोणीतरी असावं...
माझ्या प्रश्नांना,
उत्त्तर देणार कोणीतरी असावं...
माझ्या मनाला,
जाणणार कोणीतरी असावं...

खरचं वाटतं कोणी तरी असावं...
माझ्यावर स्वत:पेक्षा,
जास्त प्रेम करणार कोणीतरी असावं...
एकांतात बसण्यासाठी,
वेळ देणारं कोणीतरी असावं...
एकांतात असणाऱ्या शांततेला,
सामाजुन घेणारं  कोणीतरी असावं...

खरचं वाटतं कोणी तरी असावं...
शब्दांच्या पलीकडे भावना,
जाणणार कोणीतरी असावं... 
मनातल्या शब्दांना,
ओठी आणणारं कोणीतरी असावं...
स्वतःला विसरून,
माझ्यामध्ये हरवणारं कोणीतरी असावं...



खरचं वाटतं कोणी तरी असावं…
खरचं वाटतं कोणी तरी असावं…


© ओंकार शिंदे 
१७ मार्च २०१५

Thursday, 26 February 2015

ए लमहा थम जा जरा, जिना अभी बाकी है...!




ए लमहा थम जा जरा,
जिना अभी बाकी है...!
अभी तो चलना सिखा है,
दौडना तो अभी बाकी है...!

दोस्तो का साथ है ,
जैसे कल की तो बात है...!
जिंदगी मे मजाक मस्ती,
जैसे उन्ह लोगोकी सौगात है...!

पलके मिटाके सपने देखना,
जैसे जिनेकी चाहत है...!
वो सपने पुरा करना,
जैसे छोटे बच्चे की दिलकी राहत है...!

जिंदगी हर तरह से जिनेकी,
एक पुरानी आदत है...!
हसते हसते रोना आ जाए,
ऐसी हमारी फितरत है...!

हर रास्ते पर जाओगे,
तो बिछारा हुँवा फुल हम ही होंगे...!
जैसे फुलोपर पाव रखोंगे,
तो आखोमे पानी लानेवाले हम होंगे...!

काश मै वक्त की जगह,
और वक्त मेरी जगह होता...!
तो जिंदगीका हर लमहा,
जिनेसे पहले मेरा गुलाम होता...!

इस वक्त के साथ ,
जिंदगी बदलना बाकी है...! 
बदलनेवाली जिंदगीके,
हिसाब चुकाना बाकी है...! 

ए लमहा थम जा जरा, 
जिना अभी बाकी है...!!


© ओंकार शिंदे 
 २६ फेब्रुवारी २०१५


Tuesday, 17 February 2015

मन हे असं ठिकाण असतं...!!!




मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये गुपित राहु शकतं
गुपित लपवून ठेवण्यासाठी
मन कठोर असावं लागतं

मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये रंगीत स्वप्ने असतात
रंगीत स्वप्ने पुर्ण करण्यासाठी
असलेल्या प्रश्नांची उत्त्तरे नसतात

मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये काल्पनिक गोष्टी असतात
जरी त्या नसल्या अस्तित्वात
तरी त्या मनाला पटतात

मन हे असं ठिकाण असतं
ज्यास फ़सवता येत नाही
फ़सवलेल्या मनात
सु:खाचे माहेर बसवता येत नाही

मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये भावनांना महत्व असतं
मनातील भावनांमुळेच
प्रेमाच्या मिलनाचं सत्व असतं

मन हे असं ठिकाण असतं
जे जाणवतं पण दिसत नाही
जाणवत असतानाही
ते शरीरात दर्शवता येत नाही

मन हे असं ठिकाण असतं 
जेथे सु:खही असतं आणि दु:ख सुद्धा असतं 
चेहऱ्यावर दाखवायचं की नाही 
हे त्या मनावर अवलंबून असतं 

खरच मन हे एक जगावेगळ ठिकाण असतं

© ओंकार शिंदे 
१७ फेब्रुवारी २०१५

Friday, 13 February 2015

वाट अजून दूर आहे... तू मला थोडा वेळ दे...!!!


वाट अजून दूर आहे
तू मला थोडा वेळ दे...!
आई तूझा ध्यास आहे
मला तू साथ दे...!

अंतर ते कापताना
हाताला आधार तूच दे...!
अंतर खूप जास्त आहे
दमलेल्या पायाला श्वास दे...!

प्रत्येक पावलावर धडपडताना
उठण्याची जाण तूच दे...!
अडचणीत तुझ्या उपदेशावर
जगायचे मला भान दे...!

वाटेवरच्या अडचणींसाठी
कल्पचित्र काढून दे...!
मृगजळासारखे भासणारे
भास ते जाणून दे...!

पायवाटेवर अडताना
मना तुझा आधार दे...!
रुतलेला काटा काढण्यासाठी
तू मला ध्यास दे...!

अंधाराचे सावट येताना
प्रकाशाचा किरण तूच दे...!
थकलेले पायांना
मनाची उभारी तूच दे...!

उंच शिखरावरी असताना
कौतुकाची थाप तूच दे...!
पाय जमिनीवर राहण्यासाठी
शब्दांचा मार तूच दे...!

जाउ नकोस दूर तू
मला आयुष्यभर साथ दे...!
माझ्यासवे राहण्यासाठी
माझ्या आयुष्यभर साथ दे...

© ओंकार शिंदे
१३ फेब्रुवारी २०१५