Sunday, 23 November 2014

स्वप्न...!!!



तू छानस स्वप्न घेऊन आलीस. 
डोळे उघडता स्वप्नात हरवून गेलीस. 
मनी वाटले स्वप्न परत जगावे. 
पण जगता येणार नसेल ...
तर त्यास स्वप्न कसे म्हणावे?

परत वाटले मना समजवावे. 
डोळे मिटून स्वप्नदेशी जावे.  
स्वप्नामध्ये तुझ्या सहवासात रहावे. 
पण स्वप्नातही तू सहवास सोडणार असशील... 
तर स्वप्नदेशी तरी कसे जावे?

स्वप्नी वाटे आतातरी तुझे ध्यास सोडावे. 
तरी स्वप्नी मन तुझ्यासाठी बावरे व्हावे. 
अशावेळी तु माझ्या स्वप्नामधून दूर जावे. 
माझ्या स्वप्नी तू नसताना... 
मन हे तुझ्यासाठी का बावरे व्हावे ?

स्वप्नी वाटे तुझ्या रुसलेल्या मनात बसावे. 
तुझ्या त्या मनात फक्त माझे स्थान असावे. 
कधी वाटे त्या रुसलेल्या मनाला परत हसवावे.
पण त्या मनी व्यथा असताना...
त्यास हसवून कसे फसवावे?

कधी वाटे स्वप्नातच तुझ्यासंगे रहावे. 
सर्व क्षण तुझ्याबरोबर स्वप्नीतरी जगावे. 
तुझ्या कुशीत भान हरपून जावे. 
असे आयुष्य जर स्वप्नी असेल... 
तर मनी वाटे डोळे तरी का उघडावे?

©ओंकार शिंदे 
२३ नोव्हेंबर २०१४