Friday, 26 December 2014

प्रेम माझे असणारे... प्रेम तुझे असणारे...!!!



प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

पाऊस पडत असताना
विज कडाडत असताना
तुला माझ्या जवळ आणणारे 
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

तु जवळ असताना
केस चिंब असताना
तुला माझ्या कुशीत घेणारे
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

तु कुशीत असताना
प्रेम बहरत असताना
तुझ्या नजरेत दाटून येणारे
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

चिंब भिजलेली असताना
पावसाचे थेंब आेघळताना
तुझ्या आेठांना स्पर्श करणारे
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

हे सर्व क्षण जगताना
तुझा स्पर्श असताना
मनाला पाघाळवाणारे
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे

तूला कवेत घेताना
तुझ्या नजरेत बघताना
पावसाचे थेंब हळूच टिपणारे
प्रेम माझे असणारे
प्रेम तुझे असणारे


© ओंकार शिंदे
२६ डिसेंबर २०१४

Friday, 12 December 2014

ही गोष्ट एका चमच्याची...!!!



खूप वर्षापूर्वी होती एक जोडी
त्यांच्या आयुष्यात मस्त होती गोडी
नुकताच त्यांचे लग्न झाले
एक पिशवी रुकवत घेऊन ते नव्या घरी आले

ती तिच्या हाताने प्रेमाचा घास भरवी
ओठांचा स्पर्श होता ती लाजून मान फिरवी
आयुष्य हे असे सुंदर चालले होते
ओठांच्या स्पर्शाने तिचे हात कंपत होते

त्याला वाटे हे असेच रहावे
तिच्या हातानेच मधुर जेवण जेवावे
तिच्या हाताने जेवण्यात एवढे प्रेम असे
चव नसली तरी त्याला जेवण गोड भासे

अचानक तिला रुकवताची आठवण झाली
तिने सर्व पिशवी रिकामी केली
तिला त्यामध्ये एक छानसे यंत्र सापडले
ते वापरायचे तंत्र तिला उलघडले

त्यालाच ती चमचा म्हणू लागली
त्याच्या वापर ती संसारात करु लागली
तिला त्या चमच्याचा वापर चांगला कळू लागला
तिच्या हाताऐवजी चमचा खराब होऊ लागला

तिने सकाळी बेड टि आणला
साखरेबरोबर कपात तिने चमचा टाकला
तो चमच्याने साखर विरघळवत बसला
थंड झालेला चहा मुकाट्याने पित बसला

भाजी करताना तिने चमच्याचा वापर केला
मीठ मसाला तिने चमच्याने टाकून दिला
भाजीला आज हवी तशी चव नसणार
कारण त्या चमच्याला हाताची सर कशी असणार

आज जेवताना ती समोर नव्हती
त्या जागी चमच्याची साथ होती
भाजी खाताना त्याला चव विचित्र  लागली
हाताचा स्पर्श नव्हता म्हणून खरी चव कळली

अशा प्रकारे चमचा ढवळाढवळ करु लागला
ओठांचा स्पर्श चमच्याला होऊ लागला
अस करुन चमच्याने संसारात फुट पाडली
प्रेमाने घास भरवणारी दोघं चमच्याने खाऊ लागली

अशा प्रकारे चमचा अस्तित्वात आला
प्रेमाची मज्जा एका क्षणात घेऊन गेला
म्हणून लोक जशी दूर जाऊ लागली
स्वतःची चूक लपवण्यात दुसऱ्याला चमचा म्हणू लागली

©ओंकार शिंदे
१३ डिसेंबर २०१४

Sunday, 7 December 2014

बरं झालं अनु तू लहानगी आहेस



बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या त्या निरागस हसण्यावर
आमचे हसणे आहे
तर तुझ्या गप्प बसण्यावर
आमचे रुसणे आहे

बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या ओठी शब्द नसताना
तुझे संवाद आहेत
तर तुझ्याशी गप्पा
म्हणजे निर्विवाद आहे

बरं झालं अनु तू लहानगी आहेस
कोणी असो वा नसो
तुझे एकांतात खेळणे आहे
तुला त्या खेळी बघण्यात
दमलेले मन मग्न आहे

बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्यासंगे नाते म्हणजे
एक खरे  स्वप्न आहे
कारण अपेक्षित प्रेम
या नात्यातच आहे

बरं झालं अनु तू लहानगी आहेस
तुझ्या असण्यात किंवा नसण्यात
आयुष्यात खूप मोठा फरक आहे
कारण तुझे ते लडिवाळ हसणे
आयुष्य जगण्यासाठी असणे आहे

©ओंकार शिंदे
७ डिसेंबर २०१४