मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये गुपित राहु शकतं
गुपित लपवून ठेवण्यासाठी
मन कठोर असावं लागतं
मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये रंगीत स्वप्ने असतात
रंगीत स्वप्ने पुर्ण करण्यासाठी
असलेल्या प्रश्नांची उत्त्तरे नसतात
मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये काल्पनिक गोष्टी असतात
जरी त्या नसल्या अस्तित्वात
तरी त्या मनाला पटतात
मन हे असं ठिकाण असतं
ज्यास फ़सवता येत नाही
फ़सवलेल्या मनात
सु:खाचे माहेर बसवता येत नाही
मन हे असं ठिकाण असतं
ज्यामध्ये भावनांना महत्व असतं
मनातील भावनांमुळेच
प्रेमाच्या मिलनाचं सत्व असतं
मन हे असं ठिकाण असतं
जे जाणवतं पण दिसत नाही
जाणवत असतानाही
ते शरीरात दर्शवता येत नाही
मन हे असं ठिकाण असतं
जेथे सु:खही असतं आणि दु:ख सुद्धा असतं
चेहऱ्यावर दाखवायचं की नाही
हे त्या मनावर अवलंबून असतं
खरच मन हे एक जगावेगळ ठिकाण असतं
© ओंकार शिंदे
१७ फेब्रुवारी २०१५

This is awesome... Great Omkar cheers
ReplyDeleteखरच मन हे एक जगावेगळ ठिकाण असतं.....