Tuesday, 14 October 2014

कधी कधी...!!!





कधी कधी

मित्रांबरोबर हसताना अचानक डोळ्यात पाणी येत कधी कधी

जुने दिवस जगावे वाटतात कधी कधी

नुसतं डोळ्यात बघुन प्रेम कळतं कधी कधी

त्याच डोळ्यात बघीतल्यावर ह्रुदय धडधडतं कधी कधी

तिच्या आठवणीत राहणं आवडतं कधी कधी

त्याच आठवणीत भिजावं वाटतं कधी कधी

शब्द नसताना कविता करयला सुचतात कधी कधी

जसं पैसा नसताना खायला सुचतं कधी कधी

प्रेमात पडावं वाटतं कधी कधी

तेच जिवापाड जगावं वाटतं कधी कधी 

अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं कधी कधी

मिळालेलं लगेच जातं सुध्दा कधी कधी

लाल गुलाबाच फ़ुल आवडत कधी कधी

त्याचेच काटे टोचल्यावर फ़ेकुन द्यावस वाटत कधी कधी

एकांतात रहावसं वाटतं कधी कधी 

आयुष्य मोकळ जगाव वाटतं कधी कधी

बोलताना शब्द सुचत नाही कधी कधी 

तरी त्या शब्दांच्या पल्याड विचार असतात कधी कधी 

आयुष्यात असं घडतं बय्राचदा तरी आपण म्हणतो

होतं अस कधी कधी

होतं अस कधी कधी

© ओंकार शिंदे 
१४ ऑक्टोबर २०१४

No comments:

Post a Comment