लहान असताना मला ती आवडायची
४ थीच्या वर्गात पहिल्या बाकावर बसायची
हत्ती मुंगीच्या विनाेदावर हळूच हसायची
माझी पुस्तकामधून तिरकी नजर तिच्यावरच असायची
कोड्यात होतो तिच्याशी कस बोलायचं
हळूच जाऊन तिच्या शेजारी कस बसायचं
हेच डोक्यात असताना बाईंनी उठवलं
नशीबाने मला तिच्या शेजारी बसवलं
हेच डोक्यात असताना बाईंनी उठवलं
नशीबाने मला तिच्या शेजारी बसवलं
अाता वाटलं गाडी रूळावर आली
तुझ्या शेजारी बसायची पहिली पायरी पुर्ण झाली
आभ्यासात नेहमी ती पहिली असायची
आमची बोट काठावर असायची
तुझ्या शेजारी बसायची पहिली पायरी पुर्ण झाली
आभ्यासात नेहमी ती पहिली असायची
आमची बोट काठावर असायची
काय माहीत हे कसं जुळणार होतं
दोघांच एकमेकांकडे बघणच वेगळं होतं
वाटलं मला बोलाव तिच्याशी
फायदा होईल परीक्षेला प्रश्नांच्या उत्तराशी
दोघांच एकमेकांकडे बघणच वेगळं होतं
वाटलं मला बोलाव तिच्याशी
फायदा होईल परीक्षेला प्रश्नांच्या उत्तराशी
पेपर लिहताना मला रब्बर हवा होता
पुढच्या क्षणी तिचा हात माझ्या हातात होता
माझ्या मनात त्या रब्बरामुळे सुखाची पालवी फुटली
माझी गाडी चुकांएवजी उत्तर खोडत सुटली
पुढच्या क्षणी तिचा हात माझ्या हातात होता
माझ्या मनात त्या रब्बरामुळे सुखाची पालवी फुटली
माझी गाडी चुकांएवजी उत्तर खोडत सुटली
त्यावेळेस कळलं प्रेम आंधळ असत
प्रेमात तर सगळं सोसायचं असतं
काय सांगू त्यापरीक्षेचा निकाल काय लागला
मी राहीलो मागे पहिला आलेला बंडू लाईन मारायला लागला
प्रेमात तर सगळं सोसायचं असतं
काय सांगू त्यापरीक्षेचा निकाल काय लागला
मी राहीलो मागे पहिला आलेला बंडू लाईन मारायला लागला
निकालामुळे आमच्या जागांची अदलाबदल झाली
बघता बघता ति माझ्या मनापासून वेगळी झाली
निराश होऊन एक नजर डावीकडे टाकली
शेजारी बसलेली मिनी तर खुप सुंदर वाटली
बघता बघता ति माझ्या मनापासून वेगळी झाली
निराश होऊन एक नजर डावीकडे टाकली
शेजारी बसलेली मिनी तर खुप सुंदर वाटली
आता काय सांगू काय वाटलं
मिनीविषयी मनात खूपसारं प्रेम दाटल
प्रेमाच्या प्रश्नाच एक उत्तर कळलं
प्रेमात पोरीला कटवण्यापेक्शा स्वतः कटलेल परवडलं
© ओंकार शिंदे
५ सप्टेंबर २०१४
मिनीविषयी मनात खूपसारं प्रेम दाटल
प्रेमाच्या प्रश्नाच एक उत्तर कळलं
प्रेमात पोरीला कटवण्यापेक्शा स्वतः कटलेल परवडलं
© ओंकार शिंदे
५ सप्टेंबर २०१४

:-)
ReplyDelete